फडणवीस यांच्याकडून बोधनकरांना श्रद्धांजली Tribute to Bodhankar from Fadnavis

Share This News

नागपूर , 15 मार्च जेष्ठ पत्रकार मेघनाद बोधनकर यांच्या निधनावर  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते  देवेंद्र फडणवीसांनी तीव्र शोक व्यक्त केला. ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना  देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”  जेष्ठ पत्रकार आणि संपादक मेघनाद बोधनकर आपल्यात नाहीत हे ऐकून खूप दु:ख झाले. विदर्भ, मध्यप्रदेश तसेच  छत्तीसगढ भागात त्यांनी पत्रकारिता केली तसेच रायपुर, भोपाळ आणि पुन्हा  नागपुर येथे त्यांनी अनेक वार्तापत्रात कार्य केले. मागास क्षेत्रातील समस्यांसोबत पत्रकारांच्या  कल्याणासाठी त्यांचे योगदान सदैव लक्षात राहील. ते माध्यम परिषद-प्रेस काउंसिलचे सदस्य  देखील होते. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. दुःखाच्या या प्रसंगात परिवारातील सदस्यांना आमच्या संवेदना. अशा शब्दात फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.