आजपासून मिळणार बारावीचे ओळखपत्र

Share This News

 नागपूर
बारावीच्या परीक्षांसाठी ३ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना ओळखपत्र मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे ओळखपत्र त्यांच्या महाविद्यालयातून घ्यावे लागणार आहे.
राज्यात कोरोना संक्रमण सातत्याने वाढत आहे. नागपूरसोबतच राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक आदी जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पालक संघटनांनी बोर्डाकडे परिस्थितीचा आढावा घेऊनच परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी केली होती. पण, ती मान्य झाली नाही. आयकार्ड डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट देण्यात यावी, असे आदेशही बोर्डाने महाविद्यालयांना दिले आहेत. परीक्षेत एका विभागातील दोन ते अडीच लाख विद्यार्थी सहभागी होत असतात. परीक्षा स्थगित केल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल. १२ वीच्या परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर विविध प्रवेश परीक्षांची तयारी करावी लागते. त्यामुळे परीक्षा वेळीच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.