नागपुरात अडीच हजारावर बाधित, १२ जणांचा मृत्यू Two and a half thousand affected in Nagpur, 12 killed

Share This News

नागपूर : कोरोनाचा विळखा नागपुरात घट्ट होताना दिसत आहे. सोमवार, १५ मार्चला नागपूर जिल्ह्यात २ हजार २९८ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. सुमारे १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाचे सायंकाळी पाचच्या सुमारास ही आकडेवारी जाहीर केली.


नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सोमवारपासून सात दिवसांचे लॉकडाउन लावण्यात आले आहे. त्यानंतरही अद्याप कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आलेला नाही. नागपूर शहर आणि ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. विदर्भातील नागपूरसह अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर येथेही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गडचिरोलीतही कोरोना संसर्ग कायम आहे. विदर्भात अनेक ठिकाणी लॉकडाउन करण्यात येत असल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशात सोमवारी कोरोनाबाधितांची संख्या नागपुरात वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.