२ लाख १९ हजार रुपयांच्या घरफोडीत दोन गुन्हेगारांना अटक

Share This News

गोंदिया-शहरातील विजयनगर येथे ११ मार्च रोजी उघडकीस आलेल्या 2 लाख १९ हजार रुपयांच्या घरफोडीत दोन गुन्हेगारांना  ५ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली. बबन सुरेश भागडकर (२२) रा.मरारटोली व विकास बलीराम बुराडे (२0) रा.विजयनगर असे आरोपींची नावे आहे.
विजयनगर येथील रविंद्र बिसेन हे सहकुटूंब बाहेरगावी गेले असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्या घरच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व आलमारीत ठेवलेले २ लाख १९ हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने चोरी केले. याप्रकरणी रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होता. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बबन व विकास याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. तसेच त्यांच्याजवळून चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. उर्वरित दागिने जप्त करण्याची कारवाई वृत्त लिहेपयर्ंत सुरु होती. आरोपींना रामनगर पोलिसांच्या कोठडीत पाठविण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्‍व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, पोलिस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा, अर्जुन कावळे, भुवनलाल देशमुख, पोलिस नायक महेश मेहर, रेखलाल गौतम, तुलसीदास लुटे, दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे, पालांदूरकर, विनोद बरेय्या, मोहन शेंडे, विनोद गौतम, मुरली पांडे यांनी केली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.