दोन दिवसांनंतर त्या विहिरीने घेतले दोन बळी कार कोसळली, मायलेकीचा मृत्यू

Share This News

वाशीम : जालना ते देऊळगावराजा मार्गावर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कार कोसळून वाशीम जिल्ह्यातील मायलेकीचा मृत्यू झाला. या अपघतात तीन जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. रविवारी सकाळी सात वाजेदरम्यान ही घटना घडली. औरंगाबाद येथील काम आटोपून सकाळी परत येत असताना जामवाडी शिवारात एका ट्रकने कारला हुलकावणी दिल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कार रस्त्यापासून दहा फूट असणाऱ्या विहिरीत कोसळली. या अपघातात वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील शिंगडोह येथील आरती गोपाळ फादडे (वय ३०) आणि चार वर्षीय माहीचा बुडून मृत्यू झाला. गोपाळ विठ्ठल फादडे (वय ३५), वेदिका फादडे (दीड वर्ष) आणि जय वानखेडे (वय १७) या तिघांना ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले. या विहिरीत दोन दिवसांपूर्वी बीड येथील कार कोसळली होती. त्यात दोन युवकांचा मृत्यू झाला होता.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.