अमेरिकेच्या लष्कर कमांडर प्रमुखपदी दोन महिला अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती Two female officers will be appointed as US Army Commander-in-Chief

Share This News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लष्कर कमांडरप्रमुख म्हणून दोन महिला अधिकाऱ्यांची नावे सिनेटकडे मंजुरीसाठी पाठवली आहेत. जनरल जॅकलिन ओकोस्ट आणि जनरल लॉरा रिचर्डसन अशी या महिला कमांडरची नावे आहेत. सिनेटच्या मंजुरीनंतर एकाचवेळी या दोन महिला अधिकारी अमेरिकन सैन्यात मोठे पद भूषवतील. यापूर्वी लॉरी रॉबिन्सन यांनी हा विक्रम प्रस्थापित केला होता. 2018 मध्ये निवृत्त होईपर्यंत लॉरी रॉबिन्सन या अमेरिकन लष्कराच्या आर्मीच्या नॉर्दन कमांडच्या प्रमुख होत्या. अमेरिकन सैन्यात सर्वात मोठा रँक फोर स्टार जनरल ही आहे. आता हवाई दलाच्या जनरल जॅकलिन ओकोस्ट यांनी ते पद प्राप्त केले आहे. 2020 मध्ये जॅकलिन ओलेस्ट संरक्षण विभागात एकमेक महिला फोर स्टार जनरल बनल्या आणि अमेरिकन हवाई दलाच्या इतिहासातील पाचव्या महिला ठरल्या. त्यांचे नाव वाहतूक कमांडरप्रमुख म्हणून सुचविण्यात आले आहे. याशिवाय लष्करातील थ्री स्टार जनरल लॉरा रिचर्डसन यांचे नाव साऊथ कमांडरप्रमुख म्हणून बायडेन यांनी प्रस्तावित केले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.