यवतमाळ : वाघाच्या हल्ल्यात दोघे जखमी | Two injured in tiger attack

Share This News

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यामधल्या पाटणबोरी लगत असलेल्या जुनोनी शिवारात गुरुवारी रात्री वाघाच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आलीय. यासंदर्भात वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जुनोनी शिवारात दोघे जण शेतीवर रात्री पहारा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मध्यरात्री पट्टेदार वाघाने त्यांच्यावर झडप घालून हल्ला केला. यात हे दोघेही गंभीर जखमी झाल्याची माहिती शुक्रवारी सकाळी पुढे आली. या घटनेची सूचना मिळताच वन विभागाचे पथक तेथे डेरेदाखल झाले.  वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. गेल्या काही दिवसांपासून मांडवी शिवारात तब्बल 5 वाघांनी बस्तान मांडले असून त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.