चंद्रपूर जिल्हयात अपघातात दोघे ठार

Share This News

चंद्रपूर
चंद्रपूर – मूल मार्गावरील जानाळा जवळ एका दुचाकी वाहनास ट्रकने धडक दिल्यांने दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृतक दोन्ही युवक हे मारोडा येथील रहीवासी असल्यांची प्राथमिक माहिती असून प्रदिप वसंत मानकर (३५), विनोद तुळशीराम मानकर (२८) अशी मृतकांची नावे आहे.
चन्द्रपूर-मूल महामार्गावर भीषण अपघात झाला. यात मारोडा येथील दोन जागीच ठार तर एक गंभीर जखमी आहे. मृतकांमध्ये प्रदीप मानकर ,वसंत मानकर तर जखमी मध्ये गणेश वैरागडे यांचा समावेश आहे.
तिघेपन अजयपूर येथे मिस्त्री कामाला जात होते. परत येत असताना यांचा अपघात झाला. मारोडाचे सहा युवक तीन दुचाकीवरून येत असतांना, दोन दुचाकी सुखरूप बाहेर निघाल्या मात्र प्रदिप व विनोदला काळानी हिरावून नेले. अपघात झाल्यानंतर, ट्रक चालक फरार झाला.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.