चंद्रपूरजवळ रेल्वेत पकडला दोन लाखांचा मद्यसाठा Two lakh liquor seized in a train near Chandrapur

Share This News

नागपूर : धावत्या रेल्वे गाडीत सापडलेल्या सात संशयास्पद बॅगमधुन रेल्वे सुरक्षा बलाने १ लाख ९५ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. चंद्रपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे सुरक्षा बलाने ही कारवाई केली.


एका विशेष प्रवासी रेल्वे गाडीत मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली होती. गाडी चंद्रपूर स्थानकावर थांबली असता आरपीएफच्या पथकाने तपासणी सुरू केली. त्यावेळी एका बोगीत सात बॅग बेवारस स्थितीत आढळून आल्या. बॅगबाबत बोगीतील प्रवाशांकडे विचारणा करण्यात आली. मात्र कोणीच त्या आपल्या असल्याचे सांगितले नाही. त्यामुळे बॅग उतरवून उघडून पाहण्यात आल्या. त्यात मद्याच्या १,२९० बाटल्या आढळल्या. हा मद्यसाठा १ लाख ९५ हजार रुपये किमतीचा आहे. जप्त केलेला मद्यसाठा पुढील कार्यवाहीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपुर्द करण्यात आला. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवर्धन सवाई, प्रवीण कुमार यांनी ही कारवाई केली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.