जम्मू : टीआरएफच्या दोन दहशतवाद्यांना अटक

Share This News

जम्मू, 26 डिसेंबर : जम्मूमध्ये टारएफ संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केलीय. या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आलीय. रईस अहमद दार, (काझीगुंड) आणि सब्जार अहमद शेख उर्फ अश्मुजी(कुलगाम)अशी या दोन दोघा दहशतवाद्यांची नावे आहेत. ते कारने श्रीनगरकडे जात होते. त्यावेळी नारवल येथील बाह्यमार्गाजवळ पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या पथकाने त्यांना अटक केली. शुक्रवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना या दोन दहशवाद्यांसदर्भात माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी श्रीनगर रोडवर नाकाबंदी केली. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास पोलिसांनी श्रीनगर मार्गावरील वाहनांची तपासणी सुरू केली. काही कालावधीतच पोलिसांना हवे असलेल्या संशयितांची अल्टो कार तपासणी नाक्यावर आली. मात्र, नाका चूकवून फरार होण्याची तयारीत असलेल्या दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. दोघांकडे असलेल्या एका बँगमध्ये एके रायफल दोन मॅगेझिन, 60 राऊंड आणि पिस्तुल आणि दोन मॅगझिन सह 15 गोळ्यांचा साठा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करत दोघांनाही अटककेली आहे. बहू फोर्ट पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामधील दार हा दहशतवादी कारवायामध्ये सक्रीय आहे. त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. तो टीआरएफसाठी काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.