ई-रिक्शाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Share This News

नागपूर : अज्ञात ई-रिक्शाने समोरासमोर दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना २८ जानेवारीला रात्री १0 वाजताच्या सुमारास घडली. रामदयाल बालचंद्र रजक (५३) असे मृताचे नाव आहे. भीमनगर, जुना जरीपटका, इटारसी पुलिया येथे राहणारे विनय रामदयाल रजक हे २८ जानेवारीला रात्री ९.४५ ते १0 वाजताच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकल क्र. एमएच/३१/ए.यु /६0७१ ने त्यांचे वडील रामदयाल रजक यांच्यासोबत कोतवाली हद्दीत बडकस चौक ते चिटणीस पार्ककडे जाणार्‍या वॉकर रोडने जात होते. दरम्यान, नॉव्हेल्टी बॅग हाऊस दुकानासमोर एका अज्ञात ई-रिक्क्षा चालकाने त्यांच्या गाडीला समोरून धडक दिली. त्यामुळे रामदयाल हे खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता मेयो हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.