ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; दहीफळ-इंद्रठाणा फाट्यावर अपघात

Share This News

यवतमाळ: तालुक्यातील दहीफळ-इंद्रठाणा फाट्यावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने स्वत:च अपघातग्रस्त ट्रॅक्टर पेटवून दिले. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.अमोल प्रभुदास राऊत (रा.हातगाव, ता.दारव्हा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तो मोटरसायकलने नेरकडे येत असताना नवरंगे यांच्या शेताजवळ ट्रॅक्टर(एम.एच.२९/ सी-५४६१) च्या चालकाने धडक दिली. अपघातानंतर ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरचालकाने स्वत:च ट्रॅक्टरला आग लावून दिली व पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अमोल हा फायनान्स कंपनीमध्ये काम करत होता. ताे आई-वडिलांना एकटाच मुलगा आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचालकाविरूद्ध अधिकच रोष निर्माण झाला. आरोपी ट्रॅक्टरचालकाला अटक होणार नाही तोपर्यंत मृताचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा जमावाने घेतला. राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुनील खाडी यांच्यासह अनेकजणांनी ही भूमिका लाऊन धरली. नेर पोलिसांनी ट्रॅक्टरचालक सुनील चव्हाण याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.