उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसाठी आता भुयारी मार्ग Underground now for Vice President, Prime Minister

Share This News

नवी दिल्ली : नव्याने उभारण्यात येत असलेल्या संसदेच्या इमारतीला सुरक्षेचा अधिक सजग वेढा राहणार आहे. नव्या इमारतीत उपराष्ट्रपती व पंतप्रधानांना शासकीय निवासस्थान ते संसदेत जाण्यासाठी खास भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. पंतप्रधान निवास ते संसद भवन, उपराष्ट्रपती निवास ते संसद भवन असा हा भुयारी मार्ग राहणार आहे.
नव्याने तयार करण्यात येत असलेल्या या सुरक्षित भुयारी मार्गातून प्रवास करण्यासाठी उपराष्ट्रपती व पंतप्रधानांच्या ताफ्यात गोल्फ कोर्सवर असणाऱ्या लहान आकाराच्या वाहनांसारखी बुलेटप्रुफ वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

कसा असेल भुयारी मार्ग?

 • संसदेच्या नव्या इमारतीला तीन भुयारी मार्गांने जोडले जाईल.
 • भुयारी मार्गातून फक्त उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या ताफ्याला जाता येईल.
 • भुयारातून जाण्याऐण्यासाठी एकच लेन असेल.
 • भुयारी मार्गासाठी उपराष्ट्रपती, पंतप्रधानांच्या निवास-कार्यालयात बदल करण्यात येत आहेत.
 • उपराष्ट्रपतींचे निवासस्थान नव्या रचनेनुसार नॉर्थ ब्लॉकमध्ये असेल.
 • पंतप्रधानांचे निवासस्थान नव्या रचनेत साऊथ ब्लॉकमध्ये असेल.
 • राष्ट्रपती भवन या भुयारी मार्गाला जोडण्याचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही.

नव्या बदलांचा फायदा

 • उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात.
 • उपराष्ट्रपतींना नियमितपणे संसदेत यावे लागते.
 • पंतप्रधानही संसदेत नियमितपणे येत असतात.
 • या दोन्ही महत्त्वाच्या व्यक्तींना प्रचंड सुरक्षा आहे.
 • उपराष्ट्रपती, पंतप्रधानांच्या ताफ्यामुळे दिल्लीतील वाहतूक थांबविली जाते.
 • भुयारी मार्गामुळे दोन्ही व्यक्तींच्या ताफ्यांसाठी नागरिकांना थांबवावे लागणार नाही.
 • संसदेवर झालेल्या हल्ल्याची पार्श्वभूमी पाहता दोन्ही व्यक्तींनी सुरक्षा सोयीची होणार.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.