केंद्रीय केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारचा भीषण अपघात
केंद्रीय केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. अपघातात त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा देखील मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोलाजवळ हा अपघात झाला आहे.
चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यानं कारला अपघात झाला. कारमध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नीसह चार व्यक्ती होत्या. अपघातानंतर जवळील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. श्रीपाद नाईक पत्नीसह देवदर्शनासाठी गेले होते. त्यांनी धर्मस्थळ आणि कोल्लुर येथील मंदिरात पूजा केली. आज सकाळी येलापूर येथील गणपतीचे दर्शन घेतले. त्यांनर ते गोकर्ण येथे जाणार होते. सोमवारी त्यांचा कारचा भीषण अपघात झाला. पत्नी विजया नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. श्रीपाद नाईक यांची प्रकृती गंभीर असून स्थिर असल्याची माहिती आहे.