मनपा शाळेत झाले विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत;कोरोना बालवीर म्हणून सत्कार
अमरावती, २७ जानेवारी : तब्बल १० महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर इयत्ता ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून आज दिनांक २७ जानेवारी पासून शाळा सुरु झाल्या. त्या अनुषंगाने मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र.१४ वडाळी येथे विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने शिक्षण समिती सभापती आशिषकुमार गावंडे यांच्या हस्ते शाळेत येणा-या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
लॉकडाऊन च्या कठीन काळात विद्यार्थ्यांनी, लहान मुलांनी अतिशय त्रास सहन करत कोरोनाशी झुंज दिली. त्यामुळे मुलांना “कोरोना बालवीर” या मेडल ने सन्मानित करुन शिक्षण समिती सभापती आशिषकुमार गावंडे, मुख्याध्यापक योगेश पखाले व शाळेतील शिक्षकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. शाळेत आशिष गावंडे यांच्या निधितुन २५ लक्ष रूपयांचे बांधकाम सुरु असल्यामुळे मुलांनी त्यांचे विशेष आभार मानले. यावेळी शाळेत प्रवेशा आधी मुलांचे थर्मलगन ने तापमान मोजण्यात आले. तसेच ऑक्सिमिटर ने पल्स रेट मोजून, मास्क वाटून सॅनिटायझर देण्यात आले. मुलांना मेडल व पुष्प मिळाल्यामुळे यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले. या नवीन उपक्रमा बद्दल शिक्षण समिती सभापती आशिषकुमार गावंडे यांनी शाळेचे कौतुके केले. कार्यक्रमच्या यशस्वीतेकरिता शिक्षिका ज्योति अस्वार, नीलिमा गुल्हाने, चेतना बोंडे, प्रणीता देशमुख, कान्होपात्रा बुरघाटे, सुलोचना डाखोळे, प्रियंका हंबर्डे, मोनिका पंधरे, अनिता विधाते, मनीषा वाकोडे, ज्योत्स्ना खडसे ,रुपाली आंडोळे ,सुनील दारोडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रभाग क्र.९चे एस.आर.पी.एफ. वडाळी स्वास्थ निरीक्षक सुमेध मेश्राम, भाऊराजसिंग टांक, रविंद्र चोरपगार, सागर डोंगरे, परिसरातील नागरिक उपस्थित होते.