वाशीममध्ये आढळलं विनापरवाना कोविड सेंटर!

Share This News

वाशीम : शहरातील नवजीवन हॉस्पिलनं २० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी आज कारवाई केली. संबंधित हॉस्पिटलला नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर कोविड रुग्ण दवाखान्यात न घेण्याची तंबी देण्यात आली आहे.
नवजीवन हॉस्पिटलमध्ये कोविडचा विनापरवाना नसताना कोरोना रुग्णावर इलाज सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पथकानं रुग्णलयात पाहणी केली असता कोरोनाचे २० रुग्ण आढळून आले. त्यामुळं बॉम्बे नर्सिंग अँक्ट नुसार रुग्णालयाचा परवाना रद्द का करू नये, अशी नोटीस देण्यात आली असल्याचे डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले. नवजीवन हॉस्पिटलमध्ये निमोनियाचे रुग्ण आहेत. आज जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भेट दिली. आम्ही कोविड सेंटरची परवानगी घेतली नव्हती. आम्ही आज कोविड सेंटरची परवानगी साठी फाईल पाठविली असल्याचं नवजीवन हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.