गडचिरोलीतील ग्रामीण भागासाठी तातडीने वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज – एकनाथ शिंदे

Share This News

गडचिरोली : जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. विदर्भातील कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत व्हीसीद्वारे सहभागी होत श्री. शिंदे यांनी ही महत्वाची मागणी केली. याच आठवड्यात गडचिरोलीला भेट देऊन पालकमंत्री शिंदे यांनी तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता.यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याला जाणवणाऱ्या ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्याबाबत प्रामुख्याने चर्चा केली होती. जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता गडचिरोलीत दोन ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभे करण्याचे आदेशही त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले होते. मात्र हा प्लँट कार्यान्वित होईपर्यंत जिल्ह्याला अतिरिक्त ऑक्सिजन मिळवून देणे कसे शक्य होईल याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी श्री शिंदे यांनी गडचिरोली मधील ग्रामीण भागाला दिलासा देण्यासाठी तिथे वैद्यकीय मनुष्यबळ देण्याची मागणी केली. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील आयसीयू पेशंट्सना वैद्यकीय सेवा देण्यासाठी श्री. शिंदे यांच्या सूचनेनुसार टेलीमेडिसिनचा वापर करण्यात येतो. यासाठी एमडी फिजिशियन सुनीता दुबे यांची टीम मदत करत असल्याची माहिती त्यांनी श्री. गडकरी याना दिली. मात्र रुग्णाची संख्या वाढत असल्याने तिथे अतिरिक्त मनुष्यबळ गरजेचे असल्याकडे श्री. शिंदे यांनी श्री. गडकरी यांचे लक्ष वेधले. अतिरिक्त मनुष्यबळ देण्याबाबत काय करता येईल याबाबत निश्चित विचार करू असे श्री. गडकरी यांनी यावेळी आशवस्त केले. त्यासोबतच ग्रामीण भागातील वाढत्या ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरचा वापर फायदेशीर ठरू शकतो अशी सुचनाही केली. या सोबतच या दुर्गम भागाला तातडीचा दिलासा देण्यासाठी 100 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन देण्याची तयारी देखील श्री गडकरी यांनी दर्शवली. ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित आहे. विदर्भाला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या मध्य प्रदेशमधील भिलाई येथील ऑक्सिजन प्लांटवर फार काळ अवलंबून राहता येणे शक्य होणार नाही. त्यामुळे भविष्यातील ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेता तो मिळवण्यासाठी नक्की कोणते पर्याय उपलब्ध आहेत याबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, अल्पसंख्याक आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, यांच्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार उपस्थित होते


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.