अमेरिकेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुरस्कार
वॉशिंग्टन
भारत-अमेरिका संबंध वृद्धिंगत करीत नवीन उंची प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची दखल घेत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिजन ऑफ मेरीट पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने अमेरिकेत भारताचे राजदूत तरणजीत सिंह संधू यांनी हा पुरस्कार पदक स्वरूपात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रोबर्ट ओबेरॉयन यांच्याहस्ते स्वीकारला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनुबंध विशेष आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाठभेट झाली. अनेक वेळा डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला मित्र म्हणून संबोधिले. फेब्रुवारी महिन्यात डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्यावर होते. अमेरिकेत हाउडी मोदी आणि अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाद्वारे दोन्ही नेत्यांची मैत्री जगाला बघावयास मिळाली. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या तसेच आरोग्याची विचापूर केली होती. राष्ट्रपती निवडणुकीत पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प पुढील महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदापासून दूर होणार आहेत.