अमेरिकेचे संरक्षण मंत्री भारत दौऱ्यावर US Secretary of Defense visits India

Share This News

अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड जे. ऑस्टिन 19 ते 21 मार्च या कालावधीत भारत दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या मंत्रिमंडळातील भारतात येणारे हे पहिलेच मंत्री असून, भारतात येण्यापूर्वी ते जपान आणि दक्षिण कोरिया या देशांचाही दौरा करणार आहेत. 

अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजीत सिंह संधू यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत दौऱ्यावेळी ऑस्टिन हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर नेत्यांचीही भेट घेतील. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबरोबरच प्रादेशिक सुरक्षा करार, हिंद-प्रशांत क्षेत्र मोकळे आणि सर्वसमावेशक ठेवण्यासंदर्भात तसेच संरक्षण, व्यापार आणि नवीन क्षेत्रातील सहकार्य यावर चर्चा केली जाणार आहे. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.