आता १८ वर्षांच्या वरील सर्वांचे लसीकरण, केंद्र सरकारचा निर्णय

Share This News

नवी दिल्ली: देशात कोरोना चे संकट अत्यंत गंभीर पातळीवर पोहोचले असल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या १ मे पासून अठरा वर्षांच्या वरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला आहे.
सध्या ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची तरतूद आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण वर्गालाही मोठ्या प्रमाणात संसर्गाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वयोगट आणखी खाली आणण्यात यावा, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी हा निर्णय जाहीर केला आहे. आता अठरा वर्षांच्या वरील सर्वांनाच स्वतःचे लसीकरण करून घेणे शक्य होणार आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.