नागपूरात ७२ केंद्रांमध्ये लसीकरणाची व्यवस्था Vaccination system in 72 centers in Nagpur

Share This News

नागपूर , 17 मार्च
 जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकातर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे नवीन ११ केंद्र उघडण्यात आले आहे. या केन्द्रांमध्ये बुधवारी १७ मार्च पासून सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत येथे ६० वर्ष वयापेक्षा जास्त नागरिकांना व ४५ ते ५९ वर्षापर्यंतचे विविध आजाराने ग्रस्त नागरिकांचे लसीकरण केल्या जाईल. यासाठी त्यांना डॉक्टर कडून विहीत नमून्यात प्रमाणपत्र आवश्यक आहे. आता नागपूरात ७२ केंद्रांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण नि:शुल्क आहे आणि खाजगी रुग्णालयांमध्ये शासकीय नियमाप्रमाणे रु. २५० दर आकारले जात आहे. 
 महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत लसीकरण केंद्र वाढविण्याचे निर्देश दिले होते. त्यांचा निर्देशाच्या अनुषंगाने मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागाचे नवीनकेंद्रनागरिकांच्या सेवेत बुधवारपासून रुजू होतील. आतापर्यंत १७ शासकीय रुग्णालयांमध्ये तसेच ५५ खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केल्या जात आहे. तसेच मनपाच्या झोन कार्यालयांमध्ये सुध्दा नोंदणीची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. नोंदणी केल्यामुळे लसीकरणासाठी जास्त वेळ रुग्णालयात थांबण्याची गरज नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. 
या नवीन केंद्रांमध्ये इंदोरा प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्र, कपिल नगर नागरी आरोग्य केन्द्र, पारडी प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्र, शांतिनगर प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्र, हंसापुरी आयुर्वेदिक दवाखाना, नंदनवन प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्र, बाबुलखेडा प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्र, मानेवाडा प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्र, खामला आयुर्वेदिक दवाखाना, प्रभाकरराव दटके महाल रोग निदानकेंद्रआणि आयुष रुग्णालय सदर यांचा समावेश आहे. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.