भारतात लसीकरणाचा वेग वाढणार

Share This News

नवी दिल्ली,  13 एप्रिल   कोरोना संकटात भारताच्या औषध नियंत्रक महासंचालनालयाने मंगळवारी रशियाच्या स्पुतनिक व्ही कोरोना लसीस अत्यावश्यक आणि  आपतकालीन  परिस्थित सीमित वापरासाठी मंजुरी दिली.  त्यामुळे आता भारतातील लसीकरणाचा वेग वाढणार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात सीरम इंस्टीट्यूट  ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोरोना लसीस अत्यावश्यक आणि  आपतकालीन  परिस्थित सीमित वापरासाठी मंजुरी दिली होती. सीरम इंस्टीट्यू ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोरोना लसीद्वारे देशव्यापी लसीकरण सुरु आहे.

देशव्यापी कोरोना  लसीकरण कार्यक्रमाचा तिसरा टप्पा 1 एप्रिल पासून  सुरु झाला असून  45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस उपलब्ध  होत आहे. याद्वारे व्यापक लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आहे. तीव्रतेने वाढत्या कोरोना संकटात जास्ती जास्त नागरिकांचे लसीकरण हा या आरोग्य अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. 

कोरोना  लसीकरण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा 1 मार्च पासून सुरु करण्यात आला. केंद्र सरकारने 16 जानेवारी पासून  देशातील आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी  कोरोना लसीकरण सुरू केले. पुण्याच्या सीरम इंस्टीट्यू ऑफ इंडिया आणि  हैदराबादच्या  भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन स्वदेशी लसींना अत्यावश्यक आणि आपतकालीन परिस्थितीत  सीमित वापरासाठी मंजुरी दिलेली आहे. वॅक्सीन मैत्री ‘ या अभियानाद्वारे भारत अनेक देशांना भारतात निर्मित कोरोना लस पुरवीत आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.