कोरोनाच्या ‘आपत्ती’तून वडेट्टीवार सावरले

Share This News

नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार रविवार, २१ मार्चला पुन्हा आपल्या विभागाच्या कामाला लागले आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना ब्रीचकॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विजय वडेट्टीवार यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वडेट्टीवार रुग्णालयात असताना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठविले होते. या पत्रात एमपीएससीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यास सांगितले होते. सचिवांनी हे पत्र पाठविताना वडेट्टीवार यांना कळविण्याचे सौजन्यही दाखविले नाही. त्यामुळे वडेट्टीवार यांना ट्विट करीत यासंदर्भात रुग्णालयातून खुलासा करावा लागला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही वडेट्टीवार यांना विश्वासात न घेता आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिव व राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या मदतीने एमपीएससीला हे पत्र पाठविल्याचे नंतर पुढे आले. त्यामुळे वडेट्टीवार नाराजही होते. अशातच आता कोरोनातून बरे झाल्यानंतर वडेट्टीवार ही नाराजी काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचविणार काय, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.