नागपूर शिक्षण उपसंचालकपदी वैशाली जामदार
डॉ. एस. एन. पटवेंची कोकणात बदली
शालेय शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी व तत्सम पदावर कार्यरत असलेल्या अधिकार्यांच्या पदोन्नतीचे आदेश बुधवारला शासनाकडून जारी करण्यात आले. यामध्ये नागपूर शिक्षण उपसंचालकपदी वैशाली जामदार यांना पदोन्नती देण्यात आली. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. एस.एन. पटवे यांना कोकण बोर्डात विभागीय सचिव पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर विभागातील शिक्षण उपसंचालक, नागपूर बोर्डाचे अध्यक्ष व सचिव ही महत्त्वाची पदे प्रभारींवर होती. बुधवारी शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ दर्जाच्या अधिकार्यांची पदोन्नती केली. यात शिक्षण उपसंचालकाचे कायमस्वरुपी पद विभागाला मिळाली. गेल्या तीन वर्षांपासून शिक्षण उपसंचालकाचा कारभार प्रभारीवर सुरू होता. |