वरवरा राव यांना कोर्टाने दिली दोन आठवड्यांची मुदत Varvara Rao was given a two-week term by the court

Share This News

नागपूर :

गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड येथे झालेल्या वाहनांच्या जाळपोळ प्रकरणात तेलुगु कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन दिला आहे. या जामिनाशी संबंधित बाबींची पूर्तता करण्यासाठी त्यांना दोन आठवड्यांची मुदत उच्च न्यायालयाने दिली आहे.


प्रकृतीच्या कारणावरुन वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. त्याच आधारावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही त्यांना गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड येथील जाळपोळप्रकरणी जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि सॉलव्हन्सी (पतदारी प्रमाणपत्र) राव यांनी सादर करणे अपेक्षित होते. यात त्यांना पतदारी प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी शुक्रवार, ५ मार्चला उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदज दिली. रोख रक्कम लवकर गडचिरोली न्यायालयापुढे सादर करण्याचे राव यांच्या वकिलांनी मान्य केले. अॅड. फिरदोस मिर्झा आणि अॅड. निहालसिंग राठोड यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.