वाझेला हवाय पेन, कागद, कार्बन पेपर, NIA कोर्ट म्हणाले…

Share This News

मनसुख हिरेन प्रकरणात सुनिल मानेची तिसरी अटक करण्यात आल्यानंतर आज शुक्रवारी नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (NIA) च्या टीममार्फत अटक करण्यात आली. या अटकेनंतर आज एनआयए कोर्टाने सुनिल मानेला २८ तारखेपर्यंत एनआयए कोठडी दिली आहे. याआधीच एटीएसमार्फत या संपुर्ण प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आील आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाकडून या संपुर्ण प्रकरणात एनआयएमार्फत चौकशी होत आहे. या चौकशीचाच भाग म्हणजे आज सुनिल मानेची या संपुर्ण प्रकरणात तिसरी अटक आहे. आज झालेल्या एनआयए कोर्टातील सुनावणीत सचिन वाझे यांच्या वकिलांकडून पेन, कागद आणि कार्बन पेपरची मागणी करण्यात आली. तशी मागणी सचिन वाझे यांच्या वकिलांकडून एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. या मागणीवर कोर्टानेही आपली भूमिका आजच्या सुनावणीत स्पष्ट केली.

NIA कोर्टात काय झाला युक्तीवाद ?

सुनिल माने यांना दुपारी २ च्या सुमारास NIA स्पेशल कोर्टात आणण्यात आले. माने पहिल्या दिवसापासून सहकार्य करत असतानाही अखेर NIA मार्फत पहाटे माने यांना अटक करण्यात आली. हे कायद्याने चुकीचे आहे, म्हणूनच त्यांना तातडीने जामीन मिळावा असा युक्तीवाद मानेंच्या वकिलांकडून करण्यात आला. चौकशीला सहकार्य केले, पण त्यानंतर 48 तासाच्या चौकशीनंतर अटक करणे हे चुकीचे आहे, असा युक्तीवाद वकिलांकडून करण्यात आला. सध्या NIA कडे मानेंविरोधात कुठलेही पुरावे नाहीत. तसेच मानेचा या गुन्ह्यात कोणताही सहभागही नाही. फक्त तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर ही अटक करण्यात आली असल्याचा युक्तीवाद मानेच्या वकिलांनी केला.

पण मनसुखच्या हत्येच्या गुन्ह्यात मानेचा स्पष्ठ सहभाग असल्याचे ATS तपासात समोर आले आहे. त्याच बरोबर काही तांत्रिक पुरावेही माने विरोधात आढळून आल्यानेच ही अटकेची कारवाई केली असल्याचे NIA कडून सांगण्यात आले.
या संपुर्ण अटकेच्या घटनाक्रमानंतर मानेला मानसिक त्रास देऊ नये आणि दररोज मेडिकल होईल का ? त्याची एक काँपी आम्हालाही द्यावी. किमान रिमांड काँपी तरी देण्यात यावी, अशी मानेच्या वकिलांकडून कोर्टाकडे मागणी करण्यात आली. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनिल माने यांना NIA कोर्टाने २८ पर्यंत NIA कोठडी सुनावली आहे.

सचिन वाझेची पेन, कागद, कार्बन पेपरची मागणी 

सचिन वाझे आणि रियाजुद्दीन काझी यांची देखील आज न्यायालयीन कोठडी संपली होती, दोघांना व्हिडीओ कन्फरसिंग द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोघांना ५ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे.
दरम्यान सचिन वाझेने वकिलामार्फत पेन, कागद आणि कार्बन पेपर मिळावा यासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला आहे. वैद्यकीय उपचारासंदर्भातली औषध मिळावी यासाठी वाझेंच्या वकीलांमार्फत दुसरा अर्ज केला होता. मात्र प्रिस्कीप्शन नसल्याने सोबत प्रिस्कीप्शन जोडा असा युक्तिवाद NIA च्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. वाझेंनी दैनंदिन वापरात लागणारे साहित्य मिळाव यासाठीही अर्ज केला होता मात्र तोही न्यायालयाने फेटाळला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.