स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने वीर सावरकर काळेपाणी मुक्ती शताब्दी यात्रेचे’ आयोजन 

Share This News

मुंबई, २५ मार्च : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू क्रांतिवीर गणेश तथा बाबाराव सावरकर यांची दि. २ मे १९२१ या दिवशी अंदमानातून काळ्या पाण्याच्या शिक्षेतून मुक्तता झाली. त्यांच्या या मुक्ततेला या वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने जनतेमध्ये त्यांच्या कार्याचे स्फुल्लिंग चेतविण्यासाठी ‘वीर सावरकर काळेपाणी मुक्ती शताब्दी यात्रेचे’ आयोजन येत्या २ मे २०२१ या दिवशी करण्यात आले आहे.
देशातील तरुण पिढीला या यात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अन्य क्रांतिकारकांच्या कार्याचीही पूर्ण महती कळावी व खरा इतिहास समजावा, त्याचप्रमाणे देशातील हिंदुत्ववादी संघटनांनीही एकत्र यावे या उद्देशातून ही यात्रा आयोजित केली जात आहे.
२ मे या दिवशी सावरकरांना अंदमानातून सोडण्यात आल्यानंतर त्यांना तेथून ज्या मार्गाने आणले गेले त्या मार्गाला अनुसरून स्वातंत्र्यवीर ज्योतीसह एक यात्रा अंदमानातून सागरमार्गाने कोलकाता येथे येईल, त्यानंतर कोलकातामधील अलीपूर तुरुंग आणि अन्य ठिकाणांचा प्रवास करून रेल्वेने मुंबईला ही ज्योत आणली जाईल, मुंबईहून रस्त्याच्या मार्गाने स्वातंत्र्यवीर ज्योत रत्नागिरीला नेण्यात येईल. या मार्गावर ठिकठिकाणी ज्योतीचे स्वागत केले जाईल आणि छोटेखानी कार्यक्रमही केले जातील. त्यानंतर रत्नागिरीत ज्या पतितपावन मंदिरात सावरकरांनी अस्पृश्यता निवारणार्थ मंदिर प्रवेशाचा कार्यक्रम केला त्या मंदिराच्या साक्षीनेच या ज्योत यात्रेची सांगता होईल.
मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमही आयोजित केला जाणार आहे. स्वातंत्र्यानंतरच्या आत्ताच्या सुवर्णकाळात आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, लाखो क्रांतिकारक आणि देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणारे वीर जवान यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित या भव्य ज्योत यात्रेत सर्वांची बहुमोल साथ अपेक्षित आहे. हे राष्ट्रकार्य असून ते यशस्वी करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने आर्थिक साहाय्याचेही आवाहन केले आहे.
इच्छुकांनी खालील बँक खात्यावर आपला कृतज्ञता निधी जमा करावा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले आहे.
खात्याचे नाव – SWATANRTYAVEER SAVARKAR RASHTRIY SMARAK
बँकेचे नाव – KOTAK MAHINDRA BANK


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.