गावगप्पा कौतिकराव झालाच ना उशीर?

Share This News

(एक लहानसं गाव. चांदणी-बुद्रूक. हरीहरभाऊ हे तिथलं बडं प्रस्थ. गावची जत्रा
आहे, त्यामुळे त्यांच्याकडे पाव्हणे आले होते. तसे या काळात सार्‍याच गावात
प्रत्येकच घरी एक- दोन पाहुणे असतातच. गावातील मंडळी जी गावाबाहेर राहतात
ती दिवाळी नंतर येणार्‍या या जत्रेसाठी हमखास येतात. आता ही जत्राही झाली
आहे. शि‘क आहे, जत्रेचं कवित्व. हरीहरभाऊचा भाचा राहुल आता जायचा बाकी

असलेला पाहुणा. हरीहरभाऊ कडे गावातील काही मंडळी जमली आहेत. हिशेबाचं
सुरू आहे.)
हरीहरभाऊ : हं त मंग वामन्या कसी झाली जत्रा?
वामन : आता का इचारता हरीभाऊ? हरसाल करतोच ना आपून सारे. तुमी
राह्यताच देखरेख कराले…
राहुल : मामा कितीक दिवस झाले असतीन या जत्रेले?
हरी : आता थे तुह्या मामीलेच इचार…
पंडीत : बाप्पा हरीभाऊ तुमी आदी आले गावात का वह्यनी?
हरी : आता ह्या का सवाल झाला का पंडीत?
पंडीत : मंग किती साल झाले जत्रेले हे मामीले कायले इचारा लावता जवायाले?
राहुल : का हो, काकाजी मले चिडोता… जवाई जवाई म्हून आता जुई लहान हाय
ना…
वामन : हंऽऽ याले निस्त जवाई म्हनलं का ह्या जुईचं नाव घेते… न पंडीतले
काका म्हनते. कामून बाबू पंडीत काकाची भीमा नाई आवडत का? पंडेत काका तुले
जवाई म्हनते, हरीमामा नाई म्हनत कई…
राहुल : हट् बॉ…
मामी : (आतूनच) तुमी अंदर येऊन जाना राहुल…
पंडीत : बापा, जवायाची किती कायजी मामीजीले…
राहुल : मामीजी आपल्या जत्रेले किती साल झाले असतीन?
मामी : (बाहेर येत) पचासेक साल झाले असतीन. तुह्या मामाजी न माह्या
लगनाच्या वीसेक साल पह्यले तुह्या आन्याजीनं सुरू केली म्हने हे जत्रा.
वामन : आता तुह्या आन्याजीनं गावाले परकोट बांधाची शपत खा‘ी व्हती. दरोडे
वहाडले व्हते गावावर…
हरीभाऊ : आमचे बाबा म्हनलं त दमदार गडी. त्यायन परकोट बांधाचा ठरोला मंग
गावचं दैवत असेल ह्या राजेश्वराले साकडं घातलं, परकोट होऊदे, जत्रा सुरू करीन.
परकटो झाला न जत्रा सुरू झाली. दरोडेबी बंद झाले. काल्या- बाल्या पकडले गेले.
राहुल : अच्छा म्हून त्या काल्या- बाल्याच्या नावानं नैवद ठिवतेत का अजूकई…?

हरीभाऊ : आता ह्याच गोठी करान का जत्रेच्या हिशेबाचं बी पहान? दरसाल आपून
जत्रेच्या उरलेल्या पयस्याचे दोन भाग करतो, एक भाग अनाथायवर खर्च करतो न
दुसर्‍या भागात गावच्या इकासाच्या कामात खर्च करतो….
वामन : हरीभाऊ, खर्चाचा सारा हिशेब त बजरंगकडं तय्यार असीन…
हरीभाऊ : थो बजरंग हाय म्हून तुमची ठाकूरकी हाय. हिशेब ठेवते. कायजी घेते.
कोनी आजारी पडला गावात का बजरगलेच त्याची कायजी राह्यते. टाईमचा त
पक्काच हाय थो…
मामी : यायले मोठं त्याचं कौतूक, अजूक आला त नाई… म्हने आठ वाजता येतो.
घरचे राह्यते उपाशी न ह्या दुसर्‍यालुे जेऊ घालते तुपाशी…
हरीभाऊ : मालकीन, तुमाले त त्याच बजरंगसंग का दुस्मनी हाय थेच समजत
नाई… येइनच थो एवढ्यात.
वामन : थो येत हाय थो बजरंगच हाय का?
पंडीत : अबे थो गधा हाय…
वामन : ज्याले त्याले आप आपलं मानूस दिसते… अबे त्याच्या मांग बजरंगच
हाय…
हरीभाऊ : सुरजुस्याच्या लेकीची डिलेव्हरी हाय म्हून बजरंग तिकडं गेलता,
जिल्ह्याले. तुमच्याकून व्हते का? आता सुरजुस्याले नातू झाला त सालेहो पेढे खाले
आधी धावान…
वामन : जसा सुरजुस्युो नातू बजरंगपाईच व्हनार हाय.
हरीभाऊ : असं वंगाय बलाले आधी ह्या वामन्या…
बजरंग : (घाईघाईत) थोडा उसीर झाला. पन डिलेव्हरी झाली. सुरजुस्याले नातू
झाला…
पंडीत : मोबाईलवर एसएमएस करुन टाकतो त्याले…
हरीभाऊ : हे आधी करसीन ना तू… घेनं न देनं न आयत्यावर बदी जानं… जाऊदे
बजरंग हिसेब यार हाय का?
बजरंग : तयार हाय ना काकाजी. एकदम तयार हाय. ’कस्त सोनाराची वर्गनी
आली नाई न तुमच्याकडचा खर्च याचा हाय..

हरीभाऊ : थ्या सोनाराच्या वर्गनीचं जाऊदे. देते थो, एक हजार एक देते. थे
माह्याकून अ‍ॅड करुन टाक. माहा खर्च म्हनसीन त माही वर्गनी जाऊन आता
माह्याकळं आठशे बत्तीस रुपये उरले हाय. बजरंग : थांबा आता सांगतो किती बाकी
हायत पयसे.
पंडीत : आता बजरंग कॅलक्युलेटर कहाडन.
मामी : तुमुो त सुद्या मानसाले चेडे लावनं चांगलन जमते बस…
वामन : पन वह्यनी, तुमी आता ठावरक आमच्याकून बलत व्हत्या ना…
हरीभाऊ : तुमच्याकून नाई, माहञया ईरोधात बलत व्हत्या… माह्या ईरोधात बलने
ह्या थ्यायचा लग्नसिद्ध अदिकार हाय.
मामी : हो, तुमाले त बायको म्हनजे धुपाटनंच वाटते.
हरी : आता मले तू का वाटते हे चारचौघात सांगन्याचा उसय नाई… चौदवी का
चांदऽऽ होऽऽ
मामी : लेकी लगनाच्या झाल्या पन या बुवाले काई मानूसकी आली नाई अजूक…
हट् बाईऽऽ (मामी लाजते)
पंडीत : आत्ता मायऽऽ वह्यनी त लाजल्या…
मामी : चाल रे चोंबड्या, याचं त तोंड लयच वाजते माय. अजी तुमी न याले
माजवून ठिवला हाय.
बजरंग : (त्याचं या सर्‍यात लक्ष नाही) हं, एकशे वीस टक्के!
पंडीत : आता हरीभाऊनं मले किती माजवून ठिवला हाय याचा हिसेब ठेवन्याची
तुले काई गरज नाई बजरंग…
बजरंग : अबे, मी गेल्या सालपेक्षा एकशेवीस टक्के बचत झाली, देवयाजवडच्या
हुंडीत पयसा जमला म्हून हे शक्य झालं, हे सांगत व्हतो मी.
हरीभाऊ : यायले त कानाई बजरंग, निस्त्या मस्त्या पाह्यजेन. काम नोको…
पंडीत : भाऊ म्या जत्रेत दरसाल कोठी सांभायतो ते नाई दिसत…
वामन : गावच्या बायका राह्ते, तरन्या पोरी राह्यते तठी बरं वाटते तुले. तुले करा
तबी का लागते रे?

हरीभाऊ : आता दरसालचं हे भांडन आता उकरुन कहाडू नोका. या वामन्याचं लगन
लावून द्या लागते.
बजरंग : पहा भाऊ आपल्याकडं बत्तीस हजार आठशे चौतीस रुपे आठाने बाकी हाय.
पंडीत : मंग चौदा हजारात याचं लगन व्हते. याचं लगन लावून देने म्हनजेबी
गावाचा इकास करन्यासारकच हाय. ह्या साला लंगलंग ’रते म्हून गावचे इकास
कामं रेंगायत राह्यते. लगन करुन ह्या आपलञया कामी लागला का गावचा इकास
व्हइन.
राहुल : त्यानं एक मातर व्हईन, वामन मामाले लेकरु व्हइन न गावच्या
लोकसनखेत एकानं भर पडीन. त्यालेई गावचा इकासच म्हनता येइन.
वामन : पाह्य हरीभाऊ, भासा लगनाचा इसय निंघाला का बलला. आता पावतर
चुप व्हता. कोनाच्याई लगनाचा इसय याले मोठा चांगला वाटते. मामाजी भास्याचं
लगन लावून द्या. नोकरीबी लागली हाय आता. मास्तर झाला भासा… जुईऽऽ
मामी : एऽऽ चोंबड्या नसत्या ठिकानी नाक नोको खुपसू… आमचं आमी पाहू.
राहुल : मामी पाह्यनं व… जुई न मी का कराचं ते पाहू…
हरीभाऊ : आता परकरन इथवर आलं का आमचं आमी पाहू… मालकीन लक्षात
आलं का तुमच्या?
पंडीत : म्हून त संभाव्य जवाई जत्रा होऊन चार दिवस झाले तबी घरातून पाय
निंघत नाई त्याचा…
राहुल : जाचं हाय मले, पाह्यटंच्याच गाडीनं जातो. कितीची हाय थे गाडी?
पंडीत : साडेचार वाजता निंघते.
बजरंग : मी उठवून देइन तुमाले जवाई…
राहुल : बजरंग मामाऽऽ तुमीबी मले चिडोता…
बजरंग : तसं नाई, भासा म्हंजे राखीव जवाईच असते. कुठीच नाई ज्यमलं लेकीचं
त भासा राह्यतेच.
मामी : माही लेक का असीतसी हाय का? कुठीच नाई ज्यमनार…
राहुल : होव ना…
वामन : आता कायले होव? कायले होव? जुईऽऽ

राहुल : आता मामा तुमीच सांगानं यागून टाकानं यायले काई…
पंडीत : म्हनजे ज्यमलं हाय का?
मामी : त्यायले पाह्यटच्या गाडीनं जाचं हाय. चाला राहुलसाहेब, जेऊन घ्या. या
लंगचोटायच्या नादी लागानं त झोप व्हनार नाई न सकायची गाडी चुकन तुमची.
बजरंग : मी उठोतो ना…
वामन : होव, गावात कोनालेबी पाह्यटच्या गाडीनं जाचं असीन त बजरंगले सांगून
टाकाचं. पुढची कायजी बजरंगची राह्यते. थो साडेतीनलेच उठोते. मंग ठेसनात
नेऊन देते. जागा पकडून देते न कंडक्टरनं घंटी मारेवरी तठीच राह्यते. त्याच्याई
बाद गाडी गेली का ज्याच्या घरचा पाव्हना असीन त्याच्या घरी जाऊन सांगते.
गाडी नंबर देते. या गाडीनं गेला म्हून. न पाव्हन्याच्या गावले ’ोन करुन गाडी
नंबरसकट तो कोन्या गाडीनं निंघाला हाय न कधी पोहोचनं हे सांगूनच घरी जाते…
हरीभाऊ : आता राह्यते एखाद्याले आस्थेवाईकपना… तुमाले कामून त्याचं इतलं?
पंडीत : इतका? का ’ोनवर थो हेबी सांगते का रस्त्यात कुठी कुठी पुल हाय,
घातक वयनं किती हाय. रस्ता कुठी खराब हाय. म्हून पाव्हन्याले कसी मंधली सीट
धरुन दे‘ी, दचके नाई बसनार…
बजरंग : अबे जे करावं थे मनापासून कराव…
राहुल : बजरंगमामा तुमी उठोसानं ना मले? माहात इचार व्हता का गाडी घेऊन
याचा हिरोहोंडानं दोन तासात पहोचतो मी माह्या गावले. येथून जिल्हा दीड तास न
अध्या तासात गावले.
पंडीत : मनग संग बजरंगमामाले घेऊन जाचं व्हतं. म्हंजे तुमाले का नाई जवाईबापू
रस्तानं काही पाहाची गरजच नोती. बजरगमामाचं सांगत व्हता… जवाईबापूऽऽ
समोर पहा, आठ ’ुट, दोन इंचावर टरक हाय, पाह्यजा पंधरा ’ुटावर यस्टी हाय,
बाजुनं चार ’ुटावरुन बैलागाडी जात हाय… अररे! तिकडं झाडाव बंदरं हाय तिकडं
पाहू नोका…
राहुल : आता असं सांगलं त का हरकत हाय?
वामन : जवाईऽऽ ईऽऽ खड्डा, दोन ’ुटाचा खड्डा तीन ’ुटावर… पाह्यजाऽऽ
हरीभाऊ : कारे तुमी कामून थ्या बजरंगचा खेदा खाता?

बजरंग : कामाचे न धामाचे यायले दुसरन का सुचनार हाय भाऊ? जाऊद्यानं…
पंडीत : होव, ह्या मारव कामाचा न धामाचा… काम करडीचं नाई न ’ुरसत
घडीची नाई… यालेच कायजी, अमक्याचं औषीध आलन का नाई तालुक्याहून,
तकम्याची गाय जनली का नाई, थ्याच्याकडं सोयरीक हाय अपबशा हाय का नाई…
बजरंग : अबे, यालेच देवाची सेवा म्हनलं हाय, निस्ता नावाचा पंडीत हाय, धमक
काहीच नाही. देव देव करत बसलं का सारं नाई व्हतं, दगडाच्या देवात काहीच नाही
राह्यत. देव राह्यते थो थ्या दगडाम्होरं हात जोडून बसेल राह्यते थ्या भक्तात…
मानसात राह्यते देव…
पंडीत : झालन सुरू बजरंगबाबाचं प्रवचन.
राहुल : पन मले पाह्यटच्या गाडीनं जाचं हाय.
बजरंग : मी उठोतो ना तुमाले. यायले काहीबी म्हनू द्या. तसंई मले उद्या
सुरजुस्याच्या लेकीले डबा नेऊन द्याचा हाय सायकलनंच जाईन. जाता जाता तुमाले
सोडून देईन स्टँडावर न म्होरं जाइन.
हरीभाऊ : मी बी उठवीन ना जवायाले… मलेई काकड्याले जाचं लागते.
मामी : मी उठतोच ना… जुईले कालेजले जा लागते. तिची यस्टी चुकली का सारं
बिनसते काम..
पंडीत : तसं मलेबी उद्या देवयात पाह्यटंच जाचं हाय, मी बी हाक मारीन ना…
वामन : मंग मी असं करतो भाऊ तुमच्याकडंच जेवतो न अठीच झपतो म्हंजे
पाह्यटं बाबाले उठवन न स्टऽडावई पोहोचवून देइन…
पंडीत : यानं ज्यमोलं आपल, जेवनाचं अठीच.
हरीभाऊ : आता आपल्याले तसंई अठीच जेवाचं राह्यते. सकाई मंग सरपंचाले
दाखवून देइन हिसेब न ठरवू पुढंच पुढे…
मामी : चाला आता जेऊन घ्या, मलेबी इळभर आराम नाई.

सगळे : चाला, चाला…

प्रसंग – 2

(निवेदक : जेवणं झाल्यावर निजानिज होते. राहुल आपल्या खोलीत झोपायला
जातो. जिन्यावर अपेक्षितपणे जुई भेटतेच… दोन तौण जिव असे एकांतात
भेटल्यावर…)
राहुल : मंग जातो पाह्यटच्या गाडीनं…
जुई : मंग इतला बजार कायले केला? जातो, मले उठवा… जसं एका मानसाले
आमी जागं आनलीच नसती…
राहुल : तुमी त जिंदगीची जाग आनली हाय.
जुई : चाला, काहीतबीच बलत राह्यता… तुमी गेल्यावर मंग आठवत राह्यते सारं…
राहुल : मंग करमत नाई, हो ना?
जुई : आमी असं कवा म्हनलं? उग्गाच आपलं आपूनच ठरवून घ्याचं…
राहुल : कामून माही आठवन येत नाई…
जुई : उंऽऽहूऽऽ
राहुल : नाई?
जुई : नाई ना…
राहुल : नाई? (तिला जवळ घेतो)
ुजुई : उईऽऽ सोडा ना… पाहीन ना कोनी.. बेसरमपनाची हद झाली बा. मान ना
मान मै तेरा मेहमान…
राहुल : खरंच? आवडत नाही का तुले म्या असं काई केलेलं?
जुई : बापरे! का मानूस हाय, करकचून धरते बा… अव्व माय, माय आली ना…
(हसते) अता कसं सोडलं भेला बा एक मर्द…
राहुल : पुना धरीन त सोडनारच नाई, भेतो का कोनाले?
जुई : नाई भेत ना? मंग सांगा ना आपल्या मामाजीले लगन कराचं हाय म्हून…
राहुल : कोनासंग इचारलं त…
जुई : नाव नाही मालूम का माहवालं…
राहुल : अस्सी करते न जिव नाई राह्यत मंग… पयाली आता…

जुई : पाह्यटं भेटू…

प्रसंग 3
निवेदक : पाह्यटं मंग राहुलबाबाले उठवाले सारेच…
बजरंग : (बाहेरुन ओरडतो) राहुलसाहेबऽऽ उठा…
मामी : उठले हाय वाटते थे बंजरंगभावजी…
हरीभाऊ : उठला हाय त मले काई दिसला नाई…
मामी : तुमालेच का मलेबी दिसले नाई पन चहाळ लागली मले.
हरीभाऊ : वामनं उठोलं असीन त्याले.
मामी : थो त उबडा पडून झोपला हाय.
पंडीत : (बाहेरुन) उठले का जवाईबाबू, चार वाजले आता. साडेचारची यस्टी हाय.
भाऊ चाला, मी चाललो देवयात काकड्याले…
भाऊ : हे म्हनते बा उठला राहुलबाबा म्हून…
पंडीत : बरं मंग…
बजरंग : म्याच आवाज दे‘ा त्यायले आधी…
मामी : बजरंगभाई अंदर याना, चहा घ्या…
बजरंग : वह्यनी घेतला म्या चहा… सुरजुस्याकडून डबा घेऊन येतो तवरीक बापूले
तयार ठिवा…
भाऊ : होव, ठीक हाय. चार दहा झाले वाटते… तयार झाला का नाई बापू?
मामी : बापू त नाईत त्यायच्या खोलीत…
हरीभाऊ : अब्बा गेले कुठी? संडासले?
मामी : नाई, तांब्यात तठीच हाय. अंघोयीले त मी चालली आता… आंगधुनी
रीकामीच हाय.
भाऊ : बरं आपली मैना उठली का?
मामी : जुईना? उठनं थे. तिची गाडी साडेपाचाची असते…
भाऊ : मंग गेला कुठी बापू? सव्वाचार झालेना…
बजरंग : (बाहेरुन) झाले का तयार बापू?
राहुल : (बाहेर येत) हो, मी तयार हावो…

मामी : बापू, काई चहा म्या घेता का नाई?
राहुल : घेतला ना…
मामी : मंग पोहे करतो…
भाऊ : आता कुठी करता? गाडीचा टायम झाला…
राहुल : पोहेबी खा‘े!
मामी : बापा! म्या त केले नाई… माहाच चहा झाला नाई अजूक न तुमचा चहा
कवा झाला? कोन करुन दे‘ा?
राहुल : (लाजत) दे‘ानं चहा, पोहेबी… पाया पडतो न निंघतो मामी…
मामी : पन उठोलं कोनं न चहा कोन करुन दे‘ा?
वामन : (उठतो. आळसावल्या आवाजात) हे तुमी समजून घ्याले पाह्यजेन ना
मामी… जुईऽऽऽ
बजरंग : चाला बापू गाडी निंघून जाची व्हय.
मामी : अव, काई समजलं का तुमाले? राहुलबापूले तुमच्या मैनानं उठोलं, चहा
करुन दे‘ा, पोहेबी…
भाऊ : समजलं ना, पाह्यटची गाडी इथवर आली हाय हे दोघंबी बलत नाई ना…
काव जुईबाई…
जुई : चहाच करुन देल्लानं बाबा, बाकी तुमी ठरवान तसं…
मामी : पाहा, पहा कसी दाठ्यातच जिरली लेक लाजेन… बापूबी काई बलत नाई…
बजरंग : गाडी सुटन ना…
मामी : या बापू… अव, जाऊन बह्यनीसंग बलून याल… घरात तरन्या लेकी
असतानी पाह्यटची गाडी सुटू नये.
बजरंग : (तो बाहेरच आहे, त्याला आतलं काही ठावूक नाही.) चाला ना बापू…
पावलं कामून अडत हाय तुमचे..?
भाऊ : आता तुमच्या बापूच्या पायात बेड्याच ठोकाच्या… न बजरंग पाह्यटची
गाडी चुकू नाई म्हून रातभर जागून कायजी कराचं तुले काई कारन नाई… बापूले
कायजीचं मानूस भेटलं गड्या…
राहुल, जुई : का, बाबा तुमीऽऽ


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.