डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख

Share This News

नागपूर : सध्या सर्वत्र बोलबाला असलेल्या समाजमाध्यमांसाठी केन्द्र सरकारने नियमावली तयार केलेली असतानाच, इकडे महाराष्ट्रात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
या नवीन संघटनेचे विदर्भाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांची नियुक्ती करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने (मुंबई) यांनी नुकतेच जाहीर केले. 
महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, नागपूर श्रमिक पत्रकार संघ, पत्रकार भवन ट्रस्ट आणि प्रेस क्लब यांची संयुक्त वेबसाईट व्हाँईस आँफ महाराष्ट्र (आवाज महाराष्ट्राचा) च्या संपादक मंडळात असलेले विनोद देशमुख यापूर्वी नागपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे सरचिटणीस राहिले आहेत. 
प्रामुख्याने गावोगावी चालणारे वेब पोर्टल, यू ट्यूब चँनेल, वर्तमानपत्रांच्या डिजिटल आव्रुत्त्या आदींमध्ये कार्यरत पत्रकार, व्हिडिओग्राफर यांची ही संघटना आहे. (यात फेसबुक, व्हाँट्स अँप, ट्विटर, इन्स्टाग्राम यांचा समावेश नाही.) डिजिटल मीडियातील सर्व घटकांचे हितरक्षण, प्रशिक्षण, पत्रकारितेचे मूल्य जपणे आदी कामे आमची संघटना करणार असल्याचे राजा माने यांनी स्पष्ट केले आहे.
विदर्भातील सर्व अकराही जिल्ह्यांंमधील या नवीन क्षेत्रातील पत्रकारांनी नव्या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारून सहकार्य करावे, असे आवाहन विनोद देशमुख यांनी केले आहे. 
आँँनलाईन सदस्य होण्यासाठी नोंदणी फॉर्मची लिंक- 
https://forms.gle/zgnV4fteWPaqAkZc9


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.