अमरावती : लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रमामधून शासनाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन

Share This News

जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे जिल्हयात नव्याने ८८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून आतापर्यत १७ हजार ८१३ रुग्णांना कोरोनाची लागन झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही ३७६ वर पोहोचली असून १६ हजार पेक्षा रुग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर ४00 पेक्षा जास्त रुग्णांवर कोविड रुग्णांलयात उपचार सुरू आहे.
जैसी करणी वैसी भरणी ही पुस्तकी म्हण असली तरी आज या म्हणीचा प्रत्यक्ष प्रत्यय येतांना दिसून येत आहे. कोरोना माहामारिमुळे हाहाकार निर्माण होवू नये यासाठी प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालक करण्यापेक्षा त्याचे उल्लंधन करण्याची जनू पैजच नागरिकामध्ये लागल्याचे दिसून येत आहे. लग्न समारंभासाठी केवळ ५0 लोकांची परवानगी असतांना मंगलकार्यालयामध्ये २00 किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांची उपस्थिती ही नागरिकांच्या बिनधास्त व्यक्तीमत्वाची जाणीव करून देत आहे. स्वता सोबतच इतरांच्या जिवाशी खेळण्याचा आपल्याला अधिकार नाही याची जाणीव असतांना केवळ स्वताच्या स्वार्थासाठी, अस्तित्वासाठी असो वा मोठेपणासाठी कार्यक्रमामध्ये ५0 पेक्षा जास्त नागरिकांची असलेली उपस्थिती ही कोरोना विषाषुचा फैलाव करण्यास पुरक ठरत आहे. अनेक देशामध्ये कोरोनाची परिस्थिती अदयापही भयावह असून दुसर्‍या लाटेमुळे अनेक रूग्णांनी आपला जिव गामवल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
विशेष म्हणजे सध्या शिक्षक मतदार संघाची धामधुम असून अनेक सभा व बैठकांच्या माध्यमातून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंधन होताना दिसून येत आहे. अनेक वेळा कारवाईचा बळगा उगारला जात असला तरी कित्येक वेळा कारवाई शुन्य असल्याचे चित्र दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे लग्नसमारंभ असो वा निवडणुकीची धामधुम या दोन्ही कार्यक्रमाच्यावेळी मोजक्याच नागरिकांच्या तोडावर मास्क दिसून येत तर दुसरीकडे सोशल डिस्टन्सींग हा विषय अस्तित्वातच नसल्याचे वास्तविक परिस्थीतीवरून दिसून येत आहे.याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हे येणार्‍या काही दिवसामध्ये अमरावती करांना भोगावे लागतील यात जराही शंका नाही.भारतामध्ये दुसर्‍या लाटेची शक्यता वर्तविली जात असतांना अनेक ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येमध्ये झापाटयाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली, मुंबई सह इतर राज्यामध्ये कोरोनाचा नव्याने प्रभाव जाणवु लागल्याने स्थानिक प्रशासनाने कडक निर्बंध लादले आहे.अमरावती जिल्हयात देखिल अल्प संख्येवर येवून पोहोचलेल्या कोरोना रूग्णांची संख्या आता मोठया प्रमाणात वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.दर दिवसाला ५0 किंवा त्यापेक्षा रूग्णांची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत असल्यामुळे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक नियम हे कडक करण्यात आले आहे. तर लॉकडाऊनचा प्रश्न उदभवत नसला तरी कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणुन सोशल डिस्टंन्सींग आणि मास्क लावणे या नियमांमध्ये अधिक बंधन लावण्यात आले आहे. दिवाळी सारख्या मोठया सनामध्ये नागरिकांनी बाजारपेठामध्ये केलेली गर्दी ही कोरोनाच्या प्रसारासाठी प्रेरक ठरली असल्याने जिल्हयात पुन्हा नव्याने कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.कोरोना माहामारिमुळे संपूर्ण विश्‍व त्रासले असून तब्बल आठ महिन्याच्या प्रदिर्घ कालावधीनंतर सुरू झालेल्या अनलॉकच्या प्रक्रियेवर पुन्हा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे सावट दिसून येत आहे.कोरोना महामारिमुळे अमरावती जिल्हयातील शहरासह ग्रामिण भागही मोठया प्रमाणात प्रभावित झाला आहे. काळजी घेण्यापेक्षा कोरोना विषयीची भितीच नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात दिसून येत आहे. एकीकडे नियम पाळणारे तर दुसरीकडे नियमांचे सर्रास उल्लंधन करणारे ज्यांच्यामुळे कोरोना संक्रमण होण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.प्रशासन आणि सुज्ञ नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोरोनाची भिती काही प्रमाणात का होंइना कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र मागिल आठ दिवसापासून कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अमरावतीकरांच्या चिंतेत नव्याने भर पडल्याचे दिसून येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात आतापर्यत ८८ नविन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद करण्यात आली असून आतापर्यत १७ हजार ८१३ रूग्णांना कोरोनाची लागन झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.३७६ रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १६ हजार पेक्षा जास्त रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.