शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभरात व्हच्यरूअल रॅली
नागपूर |
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८0 व्या वाढदिवसानिमित्ताने शनिवार, १२ डिसेंबर रोजी राज्यभरात व्हच्यरूअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर विभागात उपराजधानीतील सिव्हिल लाईन्स स्थित वसंतराव देशपांडे सभागृह येथे सकाळी १0 वाजतापासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी पत्रपरिषदेतून दिली. व्हच्यरूअल रॅलीमध्ये व्हिडीओ कॉन्फ रन्सद्वारे नागपूर विभागात गृहमंत्री अनिल देशमुख, नाशिक अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, जळगाव माजीमंत्री एकनाथ खडसे, ठाणे जितेंद्र आव्हाड व बीड येथे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे मार्गदर्शन करतील. याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तालुकास्तरावर शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या रक्ताची कमतरता लक्षात घेता रक्तगट तपासणी, रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून १२ डिसेंबरला ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्याची नोंदणी गत सोमवारपासून महास्वयंम पोर्टलवर सुरूही करण्यात आली असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. पत्रपरिषदेला शहर राकाँ अध्यक्ष अनिल अहिरकर, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, माजीमंत्री रमेश बंग, माजी आमदार दीनानाथ पडोळे आदी उपस्थित होते. |