आंध्र प्रदेशात मंदिरांवर हल्ले, दोषींवर कठोर कारवाईची विश्व हिंदू परिषदेची मागणी
आंध्र प्रदेशातील विजय नगर जिल्ह्यातील रामतीरधाम गावात श्रीराम कोदण्ड मंदिरात देवी देवतांची मूर्ती भग्न करण्यात आल्याचा विश्व हिंदू परिषदे तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सोबतच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही विश्व हिंदू परिषदेने केली आहे. मंदिरांवर हल्ल्याच्या घटना आंध्र प्रदेशात वाढल्या असाही आरोप विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल
यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आंध्र प्रदेशातील रेड्डी सरकार मंदिरांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप केला आहे. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अंतर्वेदी मंदिरात ऑक्टोबर महिन्यात घटी
मंदिरात पुरातन रथ जाळण्यात आल्याची घटना घडली होती. राज्यात हिंदू मंदिरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या घटना मुळे हिंदू समाजात रोष असल्याने याविषयी विश्व हिंदू परिषदेची आंदोलनाची भूमिका असल्याचेही या प्रसिद्धी पत्रका द्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.