निवडणुकीत तालुक्यातील जास्तीत जास्त युवा उमेदवारांना मतदारांनी संधी दिली
धारणी : तालुक्यात ३५ ग्रामपंचायतींकरिता ११२ वॉर्डमधून ३३३ सदस्य निवडून द्यायचे होते. त्याकरिता ७०० उमेदवार रिंगणात उतरले होते. पैकी काटकुंभ ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली, तर उर्वरित ३४ ग्रामपंचायतींकरिता शुक्रवारी मतदान पार पडले. तालुक्यातील मतदारांनी युवा उमेदवारांना विजयाचा कौल दिल्याचे मतमोजणीअंती निकालावरून स्पष्ट झाले आहे. धारणमहू, दिया, खाऱ्या, टेम्बरू, रत्नापुर, टिंगऱ्या, धुळघाट, गडगा, गोंडवाडी, कळमखार, मांडवा, टेंभली, चौराकुंड, दुनी, जांबू, कारादा, मांगिया, नांदुरी, भोकरबर्डी, चटवाबोड, कुटंगा, पानखाल्या, राणीतंबोली, शिरपूर, बेरडाबल्डा, बिरोटी, डाबका, गोलाई, रेहट्या, सालाई, राणीगाव, झापल, दादरा, रंगुबेली, हिराबंबई, चेंडो या ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक झाली.तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. या निवडणुकीत तालुक्यातील जास्तीत जास्त युवा उमेदवारांना मतदारांनी संधी दिली आहे. त्यामुळे अधिकाधिक सरपंचपद तरुणांच्या हाती जाणार असल्याचे स्पष्ट आहे.