अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती नायडू यांनी बोलाविली बैठक VP Naidu’s key meeting
प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत आयोजित आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा सभागृह नेत्यांची बैठक बोलाविली आहे. रविवार 31 जानेवारी रोजी आयोजित ही बैठकीत व्यंकय्या नायडू यांच्या निवासस्थानी म्हणजेच उपराष्ट्रपती भवनात घेण्यात येईल. यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन तसेच संबंधीत विधेयक, कार्यक्रम तसेच अन्य महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे