अध्यक्षपद रिकामे ठेवण्याचा गिनेज रेकॉर्ड करायचाय का? भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा परखड सवाल

Share This News

मुंबई :महाराष्ट्रातील विधान सभेचे अध्यक्षपद गेल्या ३० दिवसांपासून रिक्त आहे. घटनात्मक तरतुदींची ही पायमल्ली आहे. महाराष्ट्र सरकारला विधानसभा अध्यक्षपद रिक्त ठेवण्याचा गिनेज रेकॉर्ड करायचा आहे का, असा परखड सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते तथा चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला केला.
१९३७ पासून आतापर्यंतच्या इतिहास महाराष्ट्रात विधान सभेचे अध्यक्षपद कधीही इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत रिक्त राहिलेले नाही. अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यासाठी मुख्यमंत्री किंवा सरकारची शिफारस, परवानगी घेण्याची कायद्याने गरज नाही. त्यामुळे उपाध्यक्षांनी तातडीने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आदेश काढावा, अशी मागणी त्यांनी केली. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकार बरखास्त केले होते. तेव्हा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळीही अशा घटनात्मक तरतुदींची पायमल्ली झाली होती. त्यामुळे घटनेची जर पायमल्ली होत असेल आणि त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागल्यास मग खापर आमच्या माथ्यावर फोडू नका असे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारकडून सुरू असलेल्या अनेक प्रकारांबद्दल मुनगंटीवार यांनी खेद व्यक्त केला. राज्यपालांचा अवमान काय करता, अध्यक्षपद रिकामे काय ठेवा, वैधानिक विकास मंडळांच्या माध्यमातून अडवणूक काय करता असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.