वारंगा परिसर बर्डफ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित Waranga area declared as bird flu affected area

Share This News

नागपूर जिल्ह्यातील मौजा वारंगा शिवारात कोंबड्यांचा मृत्यू बर्डफ्लू मुळे झाल्याचे आढळून आले असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये, यासाठी वारंगा परिसर बर्डफ्ल्यू बाधित आणि निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम-2009 अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार नागपूर जिल्ह्यातील मौजा वारंगा शिवारातील संसर्ग केंद्रापासून एक किलोमीटर परिसर बाधितक्षेत्र व 10 किलोमीटर परिसर हा निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे.

बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षी, कुक्कुट खाद्य आणि कुक्कुट पक्ष्यांचे खत यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, सर्व कुक्कुट आणि इतर पाळीव पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने शीघ्रकृती दलाने नष्ट करुन मृत पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, कुक्कुट पक्ष्यांचे  निवारे आणि इतर निगडित साहित्याचे निर्जंतुकीकरण करणे यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी  बाधित क्षेत्रात कार्यवाही करण्याचे  निर्देश दिले आहेत.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.