वर्धा : बजाज चौक व सिंदीच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करा

Share This News

केंद्रीय मार्ग निधी योजनेतून मंजूर असलेल्या वर्धा शहरातील बजाज चौक रेल्वे उड्डाणपूल विस्तारीकरणाचे काम बहुतांश पुर्ण झालेले आहे, परंतु रेल्वे च्या हद्दीत येणार्‍या पुलाचे कार्य वारंवार डिझाईनमध्ये बदल केल्यामुळे रेंगाळत आहे. या कार्याला गती प्रदान व्हावी म्हणून वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी बुधवारी वर्धा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेऊन काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
सिंदी रेल्वे येथे रेल्वे उड्डाणपुलाचे कार्य जवळपास पुर्ण झाले असुन रेल्वे हद्दीतील कार्य रेल्वे विभाग पुर्ण करीत असुन येत्या २ ते ३ महिन्यात संपुर्ण काम पुर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सिंदी रेल्वे उड्डाणपुलाच्या संबधीत अधिकारी वर्गाने स्पष्ट केले. पुलगांव शहरातील रेल्वे उड्डाण पुलाचे कार्य जमिन अधिग्रहण प्रश्नामुळे व कंत्राटदाराने दाखविलेल्ल्या दिरंगाई मुळे कार्य रद्द केले असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. तसेच पुलगांव शहरातील जमिन अधिग्रहण विषयामुळे रद्द झालेल्या कामाची फेरनिवीदा काढणे शक्य नसुन जमिन अधिग्रहण प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर लगेच नविन निविदा सुचना काढण्यात येईल व उर्वरीत कामाला प्रारंभ होईल अशी माहिती संबधीत अभियत्यांनी दिली. या विषयावर जमिन अधिग्रहीत करण्याकरिता शेतकरी बांधवासोबत समन्वय साधुन बैठक आयोजीत करण्याची सुचना खासदार तडस यांनी यावेळी दिली व सोबतच काम लवकर पुर्ण होण्याकरिता नियोजन करण्याचे अधिका-यांना सुचित केले. आढावा बैठकीदरम्यान खासदार तडस यांनी रेल्वे विभागाच्या मुंबई व लखनौ येथिल संबधीत अधिकार्‍यांशी दुरध्वनी व्दारे चर्चा करुन सार्वजनिक बांधकाम विभागासोबत रेल्वे विभागाने योग्य समन्वय साधावा तसेच कामाचे उचित नियोजन करण्याबाबत कार्यवाहीच्या सुचना दिल्या. सदर बैठकीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कुबडे, शाखा अभियंता नळगिरे, वर्धा जिल्हा केन्द्रीय रस्ते सुरक्षा समितीचे सदस्य प्रणव जोशी तथा संबधीत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आज वर्धा जिल्हयातील बजाज चौक, सिंदी रेल्वे व पुलगांव येथील रेल्वे उड्डाण पुलांच्या विकास कामांचा आढावा घेण्याकरिता व आढावा बैठकीच्या माध्यमातुन कामांची सद्यस्थिती व केन्द्रशासनाकडे सादर करण्याकरिता बैठकीचे आयोजन केले होते. वर्धा व सिंदी येथील बहुतांश कामे पुर्ण झाली असुन पुढील ६ ते ७ महिन्यात दोन्ही विकास प्रकल्प पुर्ण होतील असे नियोजन करण्याच्या सुचना संबधीत अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहे.पुलगांव येथील रेल्वे उड्डाण पूल भूमी अधिग्रहीत झाल्यानंतर फेर निविदा प्रक्रिया पूर्ण करुन नव्याने प्रारंभ होईल. बैठकीतील आढाव्यानुसार प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेउन प्रकल्प जलदगतीने पुर्ण करण्याकरिता माझा पाठपुरावा असेल असे प्रतिपादन खासदार तडस यांनी केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.