वर्धा : हिंगणघाट-आर्वी महामार्गाची कामे ६ महिन्यात पूर्ण करावे-खा. तडस

Share This News

केंद्र सरकारच्या माध्यमातून वर्धा-हिंगणघाट, वर्धा-आर्वी नविन महामार्गाची कामे वर्धा जिल्हयात प्रामुख्याने प्रगतीपथावर आहे. सदर दोन्ही महामार्ग सिमेंट कॅांक्रीट दर्जाचे प्रस्तावीत असुन वर्धा जिल्हा मुख्यालयाला तालुकास्तरावर जोडणारे हे प्रमुख मार्ग भविष्यात उपयोगी ठरणार आहे.
या दोन्ही महामार्गांची कामे सर्व प्रशासकीय प्रक्रिया, परवानगी, तसेच तांत्रीक बाबी पुर्ण करुन पुढील सहा महिन्यात पुर्ण करण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग विभाग नागपूर यांनी नियोजन करावे असे निर्देष वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी उपस्थित अधिकारी वगार्ला दिले.
आज वर्धा जिल्हयातील राष्ट्रीय विभागाशी संबधीत विविध प्रकल्पांचा आढावा घेण्याकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
वनविभाग, महसुल विभाग, महावितरण तथा अनेक विभागाशी बैठकी दरम्यान समन्वय साधुन प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
आंजी मोठी येथून विरुळकडे जाणार्‍या रस्त्याचे व चैकाचे सौंदर्यीकरण चांगल्या प्रकारे करण्याकरिता तसेच वर्धा शहराजवळील बोरगांव मेघे, येळाकेळी, पिपरी, आंजी, खरांगणा, मोरांगणा तसेच आर्वी शहराजवळील भागाचे काम प्राधान्याने पुर्ण केल्यास जनतेला व वाहतुक दारांना त्रास कमी होईल त्याकरिता योग्य नियोजन करण्याच्या सुचना यावेळी खासदार तडस यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला दिल्या.
सेलडोह-पवनार तसेच आर्वी-तळेगांव ही दोन महामागार्ची कामे कंत्राटदाराच्या दिरगांईमुळे शासनाने रद्द केलेली असुन नविन निविदा प्रक्रिया जवळपास पुर्ण झालेली आहे,
या प्रकल्पांना देखील नजिकच्या काळात सुरूवात होईल अशी माहिती यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाने दिली.
२0१४ पुर्वी वर्धा जिल्हयात फक्त दोन राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात होते, त्यानंतर पंतप्रधान . नरेन्द्रजी मोदी व केन्द्रीय महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वातील सरकारने वर्धा जिल्हयाला अनेक नविन महामार्ग मंजूर केले व त्यातील बहुतांश कामे पुर्ण देखील झालेले आहे.
प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेऊन त्यातील समस्या सोडविण्याकरिता आज आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती.
प्रकल्प त्वरीत पुर्ण करण्याकरिता माझे प्रयत्न असुन त्यानुसार आज संबधीतांना दिशा निर्देष देण्यात आले असे प्रतिपादन यावेळी खासदार रामदास तडस यांनी केले.
सदर बैठकीकरिता राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बोरकर, शाखा अभियंता श्री. टाके, महामार्ग विभागाचे विविध तांत्रीक सल्लागार, वर्धा जिल्हा केन्द्रीय रस्ते सुरक्षा समितीचे सदस्य प्रणव जोशी उपस्थित होते.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.