वर्धा : शेतकरी विरोधी कायद्याविरोधात आंदोलन
वर्धा |
वर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने २७ डिसेंबर २0२0 रोजी शेतकरी विरोधी तीन कायदे तात्काळ रद्द करण्यात यावे यासाठी स्थानिक जमनालाल बजाज चौक, वर्धा येथे शेतकरी आंदोलन समन्वय समितीच्या माध्यमातून सुरु असलेल्या आंदोलनात वर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष श्री मनोजभाऊ चांदुरकर यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करुन केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. या कायद्याचे फायदे भाजपाच्या मंत्री, खासदार, आमदार, यांनी सांगावे असे जाहिर आवाहान जिल्हा अध्यक्ष श्री.मनोजभाऊ चांदुरकर यानी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.तसेच शेतकरी जगला तरच देश जगेल कांॅंग्रेस सरकारच्या कार्यकाळत असे शेतकरी विरोधी जुल्मी कायदे कधीच केले नाही.व शेतकरी हा या देशाचा आर्थिकदृष्ट्या कणा आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सुधीर पांगुळ शहर यांनी केले. या धरणे आंदोलनाप्रसंगी अरविंद नंदनवार, शब्बीर पठाण ,ज्ञानेश्वर मडावी बाळाभाऊ माउस्कर ,राजेश राजुरकर प.समिती सदस्य, प्रशांत झाडे, जिल्हा उपाध्यक्ष कॉंग्रेस कमिटी, ,धर्मपाल ताकसांडे, सपना शेंडे, अर्चना भोमले,अरूणा धोटे, समिरसिंग ठाकुर, अविनाश सेलुकर, विशाल चौधरी ,सुनिल,कोल्हे, पुजा जाधव यांनी मत मांडले. तसेच ,अविनाश काकडे अध्यक्ष किसान अधिकार आभियान यांनी केंद्र सरकारने केलेले कायदे हे सामान्य शेतकरी व शेतमजुरांच्या विरोधात आहे. हे स्पष्ट दिसून येते.या कायद्याचा माध्यमातून केंद्र सरकार मुठ भर धन दांडग्याच्या हातात संपुर्ण शेतीचा खरेदी विक्रीचा बाजार कोणत्याही प्रकारच्या शेतकर्याशी चर्चा केल्याशिवाय खुला करीत आहे. या माध्यमातून देश्यातील संपुर्ण ग्रामीण अर्थ व्यवस्था मुठभर धनदांडग्या लोकाच्या हातात नियंत्रित सरकारचा डाव आहे असे प्रखर मत जाहिर सभेत बोलताना व्यक्त केले. यावेळी प्रामुखाने जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष मनोज चांदूरकर, सुधिर पांगुळ, धर्मपाल ताकसांडे, शब्बीर पठाण ,ज्ञानेश्वर मडावी ,महेन्द ्रमडावी,विजय नरांजे ,अविनाश सेलुकर, रवी उमरे, सोहंनासिन्ग ठाकुर, महेश खंदारे, मंगेश थोटे, गुलाबराव नेहारे, प्रतिक भोगे ,श्रीकांत धोटे शहर सचिव, प्रविण काटकर, गणेश वर्मा, नकूल जुमडे, प्रशांत झाडेकर जिल्हा उपाध्यक्ष कॉंग्रेस, अरविंद गजभिये , पुंडलीक उईके, अनिकेत एकलारे, खुशाल बावने, मंगेश शेंडे, मिलिंद मोहोड, नदीम अहमद, रमेश तामखाने, रमेश मसराम आदिवासी कॉंग्रेस, नरेश नेहारे, अभिजित चौधरी, नलु थूल ,अतुल नाईक, कृष्णा दान्देकर, कुंदा इंगोले,,वनिता धामंदे, आशोक राऊत, कृष्णराव राऊत, प्रफुल कुचेवार, सुनिता फड., सौ.कल्पना वानखेडे, आशिष ठाकरे, ओंकार पाजारे, महादेव, निवल, विजय राऊत, प्राशिल साळवे, पुरुषोत्तम वाघमारे, सागर, सबाने, अविनाश इंदूरकर, बंदु राजगिरे, अनिकेत दाते , बाबाराव गोडघाटे, सुदेश झूंझूरकर व नंदकुमार कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यां उपस्थित होते. |