वर्ध्यातील रेशमची बंगाल आणि मध्य प्रदेशात मोठी मागणी Wardha silk is in great demand in Bengal and Madhya Pradesh

Share This News

वर्धा,दि.11: गेल्या वर्षी जिल्ह्यातील 80 गावातील 225 शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत 266 एकरात तुतीची लागवड करीत रेशीम शेती केली. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांचे रेशीम हमीभावापेक्षा दुप्पट भाव देऊन पश्चिम बंगाल तसेच मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याने रेशीम शेती सध्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उपयुक्त ठरल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.मागील वर्षी दोन एकर आत तुतीची लागवड केली. रेशीम शेतीतून मला साधारण दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पादन मिळाले. रेशीम कोषाचा सरासरी भाव लक्षात घेता मला मागील वर्षी ३२० ते ३५० रुपये किलो भाव मिळाला.इतकेच नव्हे तर काही रेशीम कोष मी आम्ही भाव पेक्षा दुप्पट भाव मिळत असल्याने पश्चिम बंगालच्या व्यापाऱ्यांना विक्री केला असे शेतकरी सचिन वाघमारे यांनी सांगितले.रेशीम शेती करणाऱ्यांना आपण स्वतः तर कधी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी व वेळोवेळी प्रत्यक्ष शेत गाठून मार्गदर्शन करतात. रेशीम शेती ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी फायद्याचीच आहे असे जिल्हा रेशम विकास अधिकारी प्यारसिंग पाडवी म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.