वखार महामंडळाच्या गोदमाला भीषण आग ; कोट्यवधींचा कापूस जळून खाक
जालन्यातील वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण आग लागून कोट्यवधींच्या कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या. शहरातील राजूर मार्गावर असलेल्या वखार महामंडळाच्या 10 नंबरच्या गोदामाला शुक्रवारी अचानक आग लागली. मिळालेल्या महितिप्रमाणे सीसीआय मार्फत खरेदी केलेला शेतकऱ्यांचा कापूस या गोदामात ठेवण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी गोदामातून अचानक धूर निघत असल्याचं कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे 5 बंब घटनास्थळी दाखल झाले तर अनेक खाजगी टँकरच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आणल्या गेली , उपविभागीय दंडाधिकारी संदीप सानप आणि माजी राज्यमंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याआगीत गोदामात ठेवलेल्या कापसाच्या सुमारे 4500 गाठी जळून खाक झाल्याने कोट्यावधी रुपयांचा नुकसान झाल्याचा अंदाजा खोतकरांनी व्यक्त केला.