राज्यात १ मे पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा

Share This News

मुंबई : राज्यात एकीकडे वाढत्या तापमानामुळे शरीराची काहिली काहिली होत आहे. तर दुसरीकडे पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास पिंपरी आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊसासह गारपीटही झाली.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसाचे ढग तयार झाले आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणासह राज्यातील सर्वच भागांत आजपासून पाच दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीटी आणि हलक्या पावसाचा सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जिल्हानिहाय अवकाळी पावसाची शक्यता

२७ एप्रिल (मंगळवार) – सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी

२८ एप्रिल (बुधवार) – पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड

२९ एप्रिल (गुरुवार) – पुणे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड

३० एप्रिल (शुक्रवार) – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड

१ मे (शनिवार) – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.