बेरोजगारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा

Share This News

चंद्रपूर
युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांच्या नेतृत्वात नुकताच बेरोजगार, असंघटित कामगार यांच्या मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. परंतु त्यावर जिल्हा प्रशासनाने निर्णय न घेतल्याने युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ठाकरे यांनी पुन्हा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेऊन याबाबत त्वरित निर्णय घ्या, अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला.
या निवेदनामध्ये युवा स्वाभिमानी पक्षाने पालकमंत्र्यांवरही आरोप केले आहेत. पालकमंत्री हे बेरोजगार व असंघटित कामगारांना न्याय देण्याचे सोडून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेली दारूबंदी हटविण्यासाठी आपली ताकद लावत आहेत. हे अत्यंत चुकीचे असून यामुळे हजारो घरे बरबाद होतील. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आपली ताकद जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याकरिता व असंघटित कामगारांना न्याय देण्याकरिता वापरावी, अशी मागणी केली आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना काळामध्ये पोलीस प्रशासनाने अत्यंत उत्तमपणे जिल्हा बंदी पाळली व जिल्ह्यामध्ये येणार्‍या जाणार्‍या वाहनांची तथा लोकांची योग्यपणे माहिती ठेवली. अशाच पद्धतीची यंत्रणा पोलिस प्रशासन दारूबंदी, गुटखाबंदीबाबत का राबवत नाही, असा सवालही करण्यात आला आहे.
जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून रेतीचोरी, कोंबडबाजार, जुगार याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली. परंतु स्थानिक पोलिसांकडून या सर्व गोष्टींना पाठबळ देण्यात येत असल्याने जिल्ह्यांमध्ये अवैध धंदे वाढलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासनाची भूमिकाही संशयास्पद आहे व पालकमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे ज्या पोलीस निरीक्षकांच्या हद्दीमध्ये अवैध धंदे दिसतील त्यांना निलंबित करावे, अशी मागणी युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांनी केली आहे. या मागण्यांबाबत प्रशासनाकडून उत्तर न मिळाल्यास २0 जानेवारी रोजी हजारो महिलांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ठाकरे यांनी या निवेदनातून दिलेला आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.