वाशिम :राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे धरणे आंदोलन

Share This News

३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन साजरा होत असताना आजही राज्य व जिल्हयातील दिव्यांगांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. शासनाने या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या, यासाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने ३ डिसेंबर रोजी राज्य अध्यक्ष मनीष डांगे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष परशराम दंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवत एकदिवशीय धरणे आंदोलन राबविण्यात आले. धरणे आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, सरचिटणीस अमोल गाभणे, तालुकाध्यक्ष मोहन कोल्हे, शहर संघटक गजानन धोंगडे, निखिल बुरकुले, रवि बनकर, शेख अहमद आदींनी उपस्थित राहून धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला.
या आंदोलनात विदर्भ संपर्क प्रमुख केशव कांबळे, विदर्भ सचिव गोपाल मोटे, राज्य संचालिका कु. बालीका होलगरे, वंदना अक्कर, बेबी कोरडे, महिला आघाडी उपाध्यक्ष यमुनाबाई बेलखेडे, जिल्हाध्यक्ष परशराम दंडे, जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप सातव, जिल्हा उपाध्यक्ष रमेश चव्हाण, राधेशाम जाधव, गोकुल जाधव, जिल्हा सचिव रेखा चव्हाण, वाशीम तालुका अध्यक्ष शिवाजी नवगणकर, अनिल भगत, मधुकर मुसळे, शे. शकील शे. हनीफ, सुरेश बोडखे, सखुबाई अडानी, सिताराम अडानी, विठ्ठल राठोड, गजानन पवार, नैमुद्दीन काजी, शे. खलीक शे. रहीम, रामदास ढगे, विलास मुसळे, गजानन तिडके, नरसिंग राठोड, भोंगाजी कढणे, संतोष पवार, मंगरुळपीर तालुका अध्यक्ष मनोज इंगळे, उज्वला पवार, धनराज जाधव, दुर्गा सोंडे, कार्याध्यक्ष विठ्ठल गादेकर, मानोरा तालुका अध्यक्ष गुलाब मनवर, राजाराम राऊत, रिसोड तालुका अध्यक्ष धनीराम बाजड, सुभाष कानडे, विठ्ठल वाकोडे, सुर्यभान इंगळे, दिलीप जुनघरे, कारंजा तालुकाध्यक्ष ब्रम्हदेव बांडे, मालेगाव तालुका अध्यक्ष संतोष आंबेकर, शिला चक्रनारायण, वर्षा गायकवाड, शमिनाबी, बेबीबाई, पंढरी कड, शालीक लबडे, गौरव तोष्णीवाल आदींसह जिल्ह्य़ातील दिव्यांग बांधव आणि भगिनी उपस्थित होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.