वाझेच्या पत्राची सीबीआय चौकशी व्हायला हवी

Share This News

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

नागपूर ः निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्या पत्राची निश्चितपणे सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
एनआयए च्या कोठडीत असलेल्या वाझे याने न्यायालयात सादर करण्यासाठी तयार केलेल्या पत्रात गंभीर आरोप केले आहेत. त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, वाझे याच्या आरोपांची चौकशी सीबीआयने केली पाहिजे. विधिमंडळ अधिवेशनात कष्टकरी, शेतकरी, कोरोना या विषयांऐवजी वाझे याच्या वर्तणुकीवर चर्चा झाली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझेबाबत वारंवार विधानसभेत माहिती दिली. मात्र, तत्कालीन गृहमंत्री, संसदीय कामकाज मंत्री वाझेचे वकीलपत्र घेतल्याप्रमाणे उठून त्याचे कौतूक करायचे. वाझेला वाचविण्यासाठी त्यांनी मंत्रिपदाची उर्जा खर्च केली. आता तर वाझेने नियुक्तीत पैसे मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे त्याची सीबीआय चौकशी व्हायला हवी, असेही मुनगंटीवार म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.