मराठा आरक्षण आम्ही मिळवूनच देणार – टोपे
जालना |
मराठा आरक्षण आम्ही मिळवूनच देणार, राज्यव्यापी ठिय्या आंदोलन साष्टपिंपळगावच्या मागण्या लगेच मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातो. आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशीही आपल्या मागण्या बाबत चर्चा करून कायदेशीर बाबीबाबत काळजी घेण्याच्या संदर्भात चर्चा करून आंदोलकांशी साष्टपिंपळगाव येथे प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी अशोक चव्हाण यांना पाठवतो, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. टोपे यांनी रविवारी साष्टपिंपळगाव येथे भेट दिली. यावेळी ते बोलत होते. साष्टपिंपळगाव राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. मीसुद्धा आपल्या आंदोलनात सहभागी आहे. आम्ही सरकार म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळवूनच देऊ. तसे भक्कमपणे पुरावे न्यायालयामध्ये आम्ही सादर करू असे सरकारच्या वतीने मी शब्द देतो, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. |