चौकशीतून येणाऱ्या मुद्यांच्या आधारे कारवाई करू-गृहमंत्री अनिल देशमुख We will take action based on the issues raised in the inquiry: Home Minister Anil Deshmukh

Share This News

उद्योगपती  मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांचे प्रकरण आणि मानसुख हिरेन हत्या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था आणि एटीएस तपास करीत असून चौकशीत आढळून येणाऱ्या तथ्याच्या आधारे कारवाई केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात बोलताना दिली.
मुंबईचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गुन्हे दाखल करून एनआयए ने अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना देशमुख यांनी हे स्पष्टीकरण दिले. सचिन वाझे यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता त्यांचे निलंबन होणार काय, या प्रश्नावर देशमुख यांनी मौन बाळगले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.