‘या’ जिल्ह्यांमध्ये हलका ते मुसळधार पावसाची शक्यता 22-october-weather-forecast-light-rain-in-kokan-madhya-maharashtra
भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक राज्यांमध्ये आज वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे देशभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा आला होता. पण आता तो दूर झाला असून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. 22 आणि 23 ऑक्टोबरला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक राज्यांमध्ये आज वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावेल. किनारपट्टी भागातही मुसळधार पाऊस कोसळेल असं हवामान खात्याने म्हटलं आहे. खरंतर, मागच्या महिन्यापासून सलग 3 वेळा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्यामुळे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली.
या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारीपट्टी भागात 22 ऑक्टोबरला मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 23 ऑक्टोबरला नागालँड, मानपूर, मिझोरम आणि त्रिपुरा तर 24 ऑक्टोबरला आसाम आणि मेघालयात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल.
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात हाहाकार
खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरु असताना झालेल्या पावसामुळं कोकण, पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भात नुकसान झाले आहे. सोयाबीन, भात, कापूस, ऊस, हळद, तूर आदी पिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनानं आणि पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.