प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान झालेली घटना दुर्दैवी- श्रीहरी अणे

Share This News

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान झालेली घटना दुर्दैवी असून असं घडायला नको होत, अशा घटनांमुळे मूळ आंदोलन मागे पडत असल्याचं मत विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी व्यक्त केलं. अशा घटनांमुळे आंदोलन मागे पडत. कायदा कुणीही हातात घेऊ नये, हिंसेची चौकशी ही केली पाहिजे, पण त्यामुळे शेतकऱ्यांचे मूळ मागण्या सुटतील का हे ही लक्षात घेणे आवश्यक असल्याचं श्रीहरी अणे म्हणाले. 

गोरेवाडा किंवा गोंडवाना हे आधीपासूनच रुजलेले नाव आहे. नागपूर ज्या गोंडानी वसवले, इथे राज्य केले. इंग्रज येण्यापूर्वीही गोंडवाना हे नाव होते. त्यांच्या नावाने गोरेवाडा प्राणी उद्यानाला नाव देणे संयुक्तिक होते.  गोरेवाडाला बाळासाहेबांचे नाव देऊन त्यांना बाळासाहेबांच्या आत्म्याला तृप्त करायचे नाही तर हे शिवसेनेला स्वतःचा एजेंडा राबवायचा असल्याची टीकाही श्रीहरी अणे यांनी केली.  शिवसेनेला माहीत आहे की विदर्भात त्यांना राजकीय स्थान नाही, तेच स्थान या माध्यमातून मिळवण्याचे प्रयत्न शिवसेना करत आहे असाही श्रीहरी म्हणाले. गोरेवाडाला प्राणी उद्यानाला  बाळासाहेब यांचे नाव देण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या विदर्भवाद्यांचा आवाज दाबण्यात आला असून विदर्भवाद्यांचा आवाज नेहमीच दाबला जातो असाही श्रीहरी अणे म्हणाले. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.