खासदार, आमदार राणाच विनामास्क फिरतात तेव्हा…

Share This News

अमरावती : वेगवेगळे आंदोलन आणि कथित स्टंटबाजीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे बडनेऱ्याचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अमरावती शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना, संचारबंदी लागू असताना या दोन्ही जबाबदार लोकप्रतिनिधींनी बेजाबदारपणाचे प्रदर्शन केल्याने त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
त्याचे झाले असे की, कोरोनामुळे प्रत्येकाला मास्क लावण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. अशात आमदार-खासदार राणा दाम्पत्य विनामास्क, विनाहेल्मेट अमरावतीच्या रस्त्यांवरून फिरायला निघाले, ते देखील बुलेटने. राणांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी त्याचा व्हिडीओही शूट केला. मात्र आता हाच व्हिडीओ व्हायरल झाल्याने राणा दाम्पत्यावर विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे. तिककडे अकोला जिल्ह्यात आमदार अमोल मिटकरी जबावबंदीचे नियम मोडत पाचशे लोक काय जमवितात, इकडे राणा दाम्पत्य विनामास्क काय फिरतात, अशी टीका नागरिकांनी करण्यास सुरुवात केली आहे. लोकप्रतिनिधींचे अनुकरण त्यांचे कार्यकर्ते बिनधास्तपणे करीत असतात. त्यामुळे या नेत्यांनी लोकांना जबाबदारपणे वागायला शिकवायचे की कोरोनाकाळा स्वत:चे व इतरांचे आरोग्य धोक्यात घालण्याचे धडे द्यायचे, असा सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.